राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी पदोन्नतीस नकार दिल्यास सेवेवर होणारे परिणाम , पाहा सविस्तर सुधारित शासन निर्णय !

Spread the love

मराठी पेपर , बालाजी पवार : महाराष्ट्र शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जर पदोन्नती घेण्यास नकार दिल्यास , सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या सेवेवर कोणकोणते विपरीत परिणाम होतात , या संदर्भात सामान्य प्रशासन विभागांकडून दि.12 सप्टेंबर 2016 रोजी सुधारित शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आलेला आहे .

राज्य शासन सेवेत कार्यरत अधिकारी / कर्मचाऱ्यांने जर पदोन्नती निवड यादींमध्ये नाव येवून देखिल नकार दिल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचे नाव सदर पदोन्नती निवड यादींमधून नाव काढून टाकण्यात येते . व सदर अधिकारी / कर्मचाऱ्यांचा पुढील 02 वर्षांकरीता पदोन्नती निवड यादी करीता विचार न करता तिसऱ्या वर्षासाठी विचार करण्यात येईल , त्यावेळी पात्रता तपासण्यात येईल .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे होणार ?

ज्यावेळी एखाद्या अधिकारी /कर्मचाऱ्यांने कायमस्वरुपी पदोन्नतीस लेखी नकार दर्शविला असल्यास , अशा अधिकारी / कर्मचाऱ्यांचा त्यानंतर होणाऱ्या कोणत्याही निवड यादींमध्ये विचार केला जाणार नाही .जर एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने प्रथम वेळी पदोन्नतीस नकार दिल्यास , तिसऱ्या वर्षानंतर दुसऱ्या वेळी निवडसुचीकरीता विचार करण्यात येईल , त्याचबरोबर दुसरऱ्या वेळेस देखिल नकार दिल्यास त्यानंतर तिसऱ्या वर्षी विचार करण्यात येईल , असा क्रम सुरु राहील .

हे पण वाचा : आता शेतीमाल तारण ठेवून मिळणार कर्ज !

त्याचबरोबर पदोन्नतीस नकार देणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना यापुर्वी आश्वासित प्रगती योजना ( 10 , 20 , 30 वर्षे लाभ ) चा लाभ अनुज्ञेय केला असल्यास , ते काढून घेण्यात येइ्रल .त्याचबरोबर एखाद्या अधिकारी / कर्मचाऱ्यांने पदोन्नतीस नकार दिल्यास , संबंधित कार्यालयातील कनिष्ठ अधिकारी / कर्मचाऱ्यांची निवडसूचीत समावेश करुन पदोन्नती देण्यात येईल .या संदर्भात सविस्तर पदोन्नतीस नकार दिल्यास होणारे परिणाम याबाबतचा GR डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक , नोकर पदभरती ,राजकीय घडामोडी इ.अपडेट साठी Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment