शासन निर्णय : राज्यातील या कर्मचाऱ्यांना 7 वा वेतन आयोग थकबाकी अदा करणेबाबत , GR निर्गमित ! दि.04.05.2023

Spread the love

राज्य शासन सेवेतील अकृषी विद्यापीठामधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी प्रदान करण्याबाबत राज्य शासनांच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम 2016 मध्ये समाविष्ठ अकृषी विद्यापीठे व कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विश्वविद्यालय , रामटेक या विद्यापीठांमधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागु करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या दि.14.10.2020 च्या बैठकीमध्ये मान्यता प्राप्त झालेली होती .तथापि राज्याच्या आर्थिक स्थितीचा विचार करुन थकबाकी प्रदान न करता दि.01 जानेवारी 2016 पासून काल्पनिक रित्या वेतनश्रेण्या मंजुर करुन प्रत्यक्ष आर्थिक लाभ दि.01 नोव्हेंबर 2020 पासून देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : सरकारी कर्मचाऱ्यांचा 5 दिवसांचा होणार आठवडा , जाणून आत्ताची मोठी अपडेट !

या संदर्भातील अधिसुचना दि.08.12.2020 रोजी निर्गमित करण्यात आलेली आहे . अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 ते दि.31.10.2020 या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी प्रदान करण्यास मान्यता देण्याचा प्रस्ताव दि.19.04.2023 च्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयासाठी सादर करण्यात आला होता .

सदर शासन निर्णयानुसार राज्यातील अकृषी विद्यापीठातील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना दि.01 जानेवारी 2016 ते दि.16 ऑक्टोंबर 2020 या कालावधीतील सातव्या वेतन आयोगाची थकबाकी प्रदान करयास मंजुरी देण्यात येत आहेत .सदर शासन निर्ण्यायांमध्ये सातव्या वेतन आयोगाची थकबाकी प्रदान करण्याची कार्यपद्धती देण्यात आलेली आहे .

हे पण वाचा : राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन व सेवानिवृत्तीचे वय 65 वर्षे होणार !

सातव्या वेतन आयोग थकबाकी प्रदान करणेबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभागांकडून दि.04.05.2023 रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करावे .

शासन निर्णय

शासकीय कर्मचारी विषयक ,नोकर पदभरती ,ताज्या अपडेट करिता Whatsapp ग्रुप मध्ये सामील व्हा !

Leave a Comment